राज्यातील अधिकारी व कर्मचार्यांना ७ वा वेतन आयोग लागु करण्यात आला आहे. या बाबत अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पगारवाढ ही जानेवारीच्या पगारात मिळेल असे सागितले होते. पण याबाबत अद्याप अधिसुचना निघाली नसल्यामुळे सातव्या वेतन आयोगाची पगार वाढ ही फेब्रुवारीच्या पगारात म्हणजेच मार्च महिन्यात होणार्या पगारात मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सातवा वेतन आयोग हा जानेवारी २०१६ पासुन राज्यात लागु करण्यात आला आहे. डिसेंबर २०१८ पर्यंतची थकबाकी टप्याटप्याने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निधी मध्ये जमा होणार आहे. प्रत्यक्षात वाढ ही जानेवारी २०१९ पासुन मिळणार असल्याचे अर्थ विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पण जानेवारीच्या पगारात ही वाढ मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
अद्याप अधिसुचना निघाली नाही
कारण त्या बाबत मंत्रालयातुन अद्याप अधिसुचना निघाली नाही. २९ जानेवारी रोजी अधीसुचना निघणार असल्याचे राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतिने सागंण्यात आले. दोन महिन्यांच्या पगारवाढीची रक्कम ही फेब्रुवारीच्या पगारात म्हणजेच माचे महिन्यात मिळणार्या पगारात मिळणार आहे. सेवानिवृत्तांना मात्र सातव्या वेतन आयोगाची पगार वाढ याच पगारात मिळणार आहे. कारण त्या बाबत २४ जानेवारी रोजी अधीसुचना काढण्यात आली आहे. त्यामुळे अधिकांरी व कर्मचार्यांना अजुन सातव्या वेतन आयोगाच्या लाभाला प्रतिशा करावी लागणार आहे.